रुग्णांशी बोलताना नीट बोला, चांगले वागा : पालकमंत्री शिरसाटांनी टोचले डॉक्टरांचे कान
छत्रपती संभाजीनगर,
औषधोपचारानेच आजार बरा होतो असे नाही, तर उपचारासाठी आलेल्या रुग्णांशी डॉक्टर चांगलं बोलले तरी त्यांचा अर्धा आजार तिथेच बरा होतो. त्यामुळे रुग्णांशी नीट बोला, त्यांच्या नातेवाईकांसोबत चांगला संवाद ठेवा. अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डॉक्टरांचे कान टोचले.
रुग्णांच्या सुविधेसाठी शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बुधवारी (दि. २६) मोफत हेल्थ कॉल सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे पालकमंत्री शिरसाट म्हणाले, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्ण, नातेवाईकांना डॉक्टरांचा
आजारपणात अन राजकारणात कॉन्फिडन्स महत्त्वाचा
आजारपणात आणि राजकारणात कॉन्फिडन्स महत्त्वाचा असतो. त्यामुळे आम्ही कॉन्फिडन्स कमी होऊ देत नाही, त्याच्या जोरावर एक-एक पायऱ्या चढत असतो. ज्याचा कॉन्फिडन्स गेला तो माणूस बाजूला पडतो, मग त्याच्यावर कितीही उपचार करा फरक पडत नाही, असेही शिरसाट म्हणाले.
नंबर दिला जात नाही. कर्मचारी डॉक्टरांनी मनाई
केल्याचे सांगतात. रुग्णालयातील २५ टक्के भांडणे ही डॉक्टरांनी न बोलल्यामुळे होतात. डॉक्टर हे पेन किलरसारखा काम करतो. तीच भूमिका खऱ्या अर्थाने डॉक्टरांची असायला हवी. तुमचा पेंशट ठीक आहे, किंवा थोडा क्रिटिकल आहे, परंतु आमचे प्रयत्न सुरू आहे. लवकरच बरा होईल.
हे डॉक्टरांचे वाक्य रुग्ण, नातेवाईकांसाठी दिलासादायी ठरते. रुग्णांचे स्माईल देऊन वेलकम केल्याने अर्धा आजार तिथेच बरा होता. परंतु काही डॉक्टर, रुग्णालयातील स्टाफ आम्ही विशेष आहोत. काही विशेष करतोय, अशा अविर्भावत असतात. तो सोडायला हवा. नवीन सुविधेमुळे रुग्णांचा थेट डॉक्टरांशी संवाद असणार आहे, असेही ते म्हणाले.