वैजापूरच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला महामंडळावर कधी घेणार?
शिवसैनिकांनी दिले आमदार प्रा. रमेश बोरनारे यांना पञ
साबेरभाई यांची महामंडळावर नियुक्ती करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचेकडे शिफारस करावी असे निवदेन शिवसैनिकांनी आमदार महोदयांना दिले आहे.

एक निष्ठावंत कार्यकर्ता ते नेता
शिवसेनेमध्ये एक निष्ठावंत कार्यकर्ता ते नेता पर्यंत ज्यांनी आपल्या शुन्यातुन विश्व निर्माण केले वैजापुर तालुका आणि छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडाभर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होवुन कट्टर शिवसैनिक म्हणून साबेरभाई यांनी काम केले.

अनेक चढउतार पाहिले नगरसेवक पदापासुन ते नगराध्यक्ष पद सलग आठ वेळेस चाळीस वर्षापासुन विक्रम करून वैजापूर नगरपालिकेवर शिवसेनाचा दबादबा कायम ठेवला आहे.

कट्टरशिवसैनिक म्हणुन कार्य केले
सदैव गोरगरीब जनतेला आपला परिवार म्हणणारे आणि तालुक्यासह जिल्हयात गोरगरीबांचा कैवारी म्हणुन संबोधले जाणारे लाडके साबेरभाई यांनी समाजसेवक व कट्टरशिवसैनिक म्हणुन कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे व त्यांना पक्षाने न्याय दयायला पाहिजे असा सूर या पञातून व्यक्त केला जातो.

आजपर्यंतच्या कार्याचा गौरव होईल
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आले आहे. शिवसेना या पक्षाने साबेरभाई यांना महामंडळावर नियुक्ती केल्यास त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव होईल आणि त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

महामंडळावर नियुक्त करण्यासाठी शिफारस करा
शिवसैनिकांच्या आग्रहाखातर आमदार होरनारे यांनी साबेरभाई यांच्या कार्याची दखल घ्यावी व त्यांना महामंडळावर नियुक्त करण्यासाठी शिफारस करावी अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

पदाधिकारी म्हणून बाबासाहेब पा. जगताप मा. सभापती, रामहारी बापु जाधव सभापती कृ.उ.वा. समिती, राजेंद्र पा. साळुंके शिवसेना तालुका प्रमुख पारस घाटे शिवसेना शहर प्रमुख ,ज्ञानेश्वर वैजीनाथ टेके,खुशालसिंह राजपुत माजी तालुका प्रमुख वैजापूर ,ज्ञानेश्वर टेके नगरसेवक वैजापूर,अमीरअली युवा सेना जिल्हा समन्वयक वैजापूर,श्रीराम गायकवाड
युवासेना तालुका प्रमुख वैजापूर
श्रीकांत पा. साळुंके युवासेना शहर प्रमुख ,हमीदशेठ कुरेशी उद्योजक,
स्वप्नील जेजुरकर नगरसेवक वैजापूर
सुलभाताई भोपळे जि.प्र. महिला आघाडी बबन त्रिभुवन नगरसेवक वैजापूर ,पदमाताई साळुंके ता.प्र. महिला
कय्युमशेठ सौदागर उद्योजक, वैजापूर
सुप्रियाताई व्यवहारे,शहर प्रमुख महिला आघाडी