झांबड यांच्या कोठडीत वाढ
बँकेच्या ९७ कोटी ४१ लाखांच्या घोटाळा प्रकरणात अटक मुख्य आरोपी माजी आमदार तथा बँकेचा संस्थापक अध्यक्ष सुभाष झांबड यांच्या पोलिस कोठडीत १८ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. शर्मा यांनी बुधवारी (दि.१२) दिले.
पोलिस कोठडीदरम्यान पोलिसांनी ३६ एफडीओडी कर्ज प्रकरण, बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र, गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, बँकेतील ठेवीदारांचे एकूण ठेवी व त्या संदर्भातील अभिलेख याबाबींवर चौकशी केली.

मात्र आरोपी काही मुद्द्द्यांवर उत्तर देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात, बँकेतील ठेवीदारांचे नेट डिपॉझिट ४,२५,४९,०७,०७३ रुपये एवढे असून त्यातील ३,२३,५६,५७,२५४ रुपये एवढे ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन
(डीआयसीजीसी) या संस्थेकडून परत मिळाले आहेत. तर उर्वरित ठेवीदारांची १,०१,९२,४९,८१९ रुपये एवढी रक्कम मिळणे बाकी असल्याचे तपसात समारे आले आहे.

तसेच आरोपींनी बनावट तयार केलेल्या ३६ एफडी अगेन्सट कर्ज घेतल्याप्रकरणात ४ खातेदार मयत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
६ खातेदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून उर्वरित १३ खातेधारकांची माहिती मिळविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, झांबड याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी आरोपीकडून स्थावर व जंगम मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती घ्यायची आहे.
तसेच फॉरेन्सिक ऑडिटनुसार नव्याने समोर आलेल्या बाबींवर आरोपीची चौकशी करायची असल्याने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.