WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.00 PM
WhatsApp Image 2025-08-13 at 4.54.01 PM
20250711_1040409208374613131454109.png
छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या नेतानगरी बिंदास मराठवाडा बिंदास महाराष्ट्र

Salute to indian Army: भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याला सलाम, आज शहरात तिरंगा याञा

करण्यासाठी आणि जवानांच्या सन्मानार्थ वैजापूरमध्ये गुरुवार, दिनांक २२ मे रोजी “भारत शौर्य तिरंगा फेरी”चे आयोजन करण्यात आले आहे. ही तिरंगा फेरी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होऊन पंचायत समिती समोर विसर्जित होणार आहे.
ही फेरी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून आयोजित करण्यात आली आहे. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना मानवंदना देण्याचा हा उपक्रम संपूर्ण वैजापूर शहर आणि तालुक्याच्या वतीने राबवण्यात येणार आहे. फेरीत अनेक घटकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. आजी-माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था व मंडळे, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला गट, शालेय विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच शहरातील जिममधील युवक-युवती या फेरीत सहभागी होणार आहेत.


ही तिरंगा फेरी म्हणजे फक्त एक मिरवणूक नसून, आपल्या देशाच्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे. या फेरीच्या आयोजनासाठी मंगळवारी (ता. २०) एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येत शहरातील नागरिक देशभक्तीचा संदेश देणार आहेत. या फेरीच्या माध्यमातून देशसेवेसाठी झटणाऱ्या जवानांचे कौतुक करण्यात येणार आहे, तसेच तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागवण्याचा उद्देशही यामागे आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.