जिल्हा वार्षिक योजनेची २० कोटींची कामे रद्द !
छत्रपती संभाजीनगर,
अब्दुल सत्तार यांच्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजुरी
मिळालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांपैकी तब्बल २० कोटींची कामे आता रद्द करण्यात आली आहेत. ही कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आली होती, त्यामुळे ती रद्द करण्यात आल्याचे विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आता बचत झालेल्या २० कोटींच्या निधीतून चांगली कामे केली जातील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे मंत्री असलेले संजय शिरसाट आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार व माजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जुंपल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संजय शिरसाट यांना मंत्रिपद आणि नंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले.
त्याचवेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक चुकीच्या कामांना मंजुरी दिलेली असल्याचा आरोप करतानाच ही कामे रद्द करण्यात येतील असे जाहीर केले होते.
त्यानुसार त्यांनी मागील दोन महिन्यांत जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचा आढावा घेऊन काही कामे रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता जिल्हा वार्षिक योजना आर ाखड्याच्या निधीतील २० कोटींची कामे रद्द करण्यात आल्याचे खुद्द संजय शिरसाट यांनी बुधवारी
ओएसडी कुणीही नेमा, पण लवकरच नेमा
मंत्र्यांचे ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच आहे. फिक्सर लोक ओएसडी होऊ नयेत ही मुख्यमंत्र्यांची भूमिका चांगली आहे, आम्ही तिचे स्वागतच करतो. जे ओएडी नेमायचे ते नेमा, फक्त ते लवकरच नेमा, एवढाच आमचा आग्रह आहे, असेही संजय शिरसाट यांनी नमूद केले.

पत्रकारांना सांगितले. शिरसाट म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा घेतला. त्यात काही कामे चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेली होती. यामध्ये काही कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या होत्या, परंतु कार्यारंभ आदेश दिलेले नव्हते. काही कामे डबल होती. तशी २० कोटींची कामे रद्द केली.
त्यामुळे हा निधी वाचला. आता त्यातून वेगवेगळी चांगली कामे केली जातील. यामध्ये कुणाला झटका देण्याचा प्रश्न नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांसाठी ३५ स्कॉर्पिओ गाड्या
रिंग करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल होणारच
डीपीसीतील काही कामांमध्ये ठेकेदारांनी रिंग केलेली आहे. यातील बहुतेक कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेकडून त्यांची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. रिंग करणाऱ्या या ठेकेदारांवर निश्चितपणे गुन्हे दाखल केले जातील, असेही पालकमंत्री शिरसाट म्हणाले.
यासोबतच जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तडीपारीची कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिनाभरात तडीपारीच्या ऑर्डर निघतील, असे शिरसाट यांनी सांगितले.
चुकीची कामे रद्द केल्याने २० कोटींचा निधी वाचविला आहे. त्यातून आता पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये खर्च करून पोलिसांना स्कॉर्पिओ गाड्या देण्यात येणार आहेत.
यामध्ये पोलिस आयुक्तालयाला २०, ग्रामीण पोलिसांना १० आणि एसआरपीएफला ५ अशा ३५ गाड्या वितरित करण्यात येतील. त्याची खरेदी जेम पोर्टलवरून करण्यात येत आहे. यामध्ये टक्केवारीचा, भ्रष्टाचाराला कुठेही वाव नाही. उर्वरित निधीतूनही औषध खरेदीसह इतर कामे केली जातील, असे शिरसाट म्हणाले.