ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

लग्न करायच तर सिबील स्कोअर चांगला ठेवा ! नाहीतर पश्चाताप करावा लागेल…

विवाह जुळविण्यात ‘सिबिल’चा नवा स्पीड ब्रेकर !
आता लग्नाळूंची चिंता वाढविणारी बातमी आहे..गडहिंग्लजमध्ये चक्क लग्नासाठी वर पहायला गेलेल्या वधुकडच्या मंडळींनी सिबील स्कोअरच्या रिपोर्टची मागणी केली.आणि नवरदेवाचा भांडाफोड झाला.

विवाह जुळवणीच्या मार्गात ‘सिबिल’चा (क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) या पतमानांकनाचा नवा अडथळा तयार होताना दिसत आहे. यापुर्वी फक्त शेती विचारून सातबारा बघितला जायचा,किंवा अगदीच नोकरी असेल तर पर्मनंट ऑर्डर बघितली जायची परंतु आता वधू पक्षाकडून अन्य बाबींबरोबरच ‘सिबिल’चीही पडताळणी केली जात असल्याने लग्नाळूच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गेल्या दशक-दीड दशकांत मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्या

आहेत. या पात्रता निकषांचे अडथळे पार करताना वर पक्षाला नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. आता यात नव्या एका ‘स्पीड ब्रेकर’ची भर पडली आहे. वधू पक्षाकडून वराचा किंवा त्याच्या कुटुंबातील प्रमुखाचा ‘सिबिल’ मानांकना तपासले जात असल्याचे समोर येत आहे. वधू पक्षाकडून ‘सिबिल” अहवाल काढला जात आहे. त्यामुळे कोणत्या बँकेत किती कर्ज आहे, त्याचे हप्ते कसे भरले आहेत की कर्ज थकीत आहे, अन्य कोणाच्या कर्जाला जामीन आहे काय अशी माहिती तपासून पाहिली जात आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.