वाहतूक कोंडी,निकृष्ट रस्त्याबाबत मांडली भुमिका
लोकसभेत छत्रपती संभाजीनगर मतदार संघाचे खासदार संदिपान भुमरे यांनी संसदेत कन्नड तालुक्यातील ज्वलंत प्रश्न मांडले.

छत्रपती संभाजीनगर – कन्नड चाळीसगाव-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -52 वरती कन्नड ते चाळीसगाव भागा मध्ये घाटात हायकोर्टाच्या सूचनेप्रमाणे अवजड वाहतुकीस बंदी केलेली आहे, त्यामुळे संभाजीनगर ते चाळीसगाव जाताना ही सर्व वाहतूक नांदगाव मार्गे वळविण्यात आलेली आहे. चालकाचे यात मोठ्या प्रमाणावर हाल होतात तर मालकास अतिरीक्त इंधन व इतर खर्च सहन करावा लागतो.
व्यापार वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका
भुमरे यांवर म्हणाले की, यामुळे कमीत कमी 120 किलोमीटर अंतर वाढत असून याचा सर्वसाधारण व्यापार वाहतुकीला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. यांवर उपाययोजना म्हणून या ठिकाणी बोगद्याच काम लवकरात लवकर पुर्ण करावा असे भुमरे म्हणाले.
संभाजीनगर ते तेलवाडी या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट
तसेच संभाजीनगर ते तेलवाडी या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जेचे झाले आहे.ही बाब मांडत भुमरे म्हणाले की, मी आपल्या माध्यमातून रस्ते व परिवहन मंत्री महोदयांना विनंती करतो की ज्या ठेकेदाराच्या माध्यमातुन हे निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे त्या ठेकेदारावर त्वरीत दंडात्मक कार्रवाई करण्यात यावी.
प्रलंबीत असलेल्या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा
ह्या रस्त्यावरिल औट्रम घाटामध्ये प्रलंबीत असलेल्या बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती भुमरे यांनी केली. जेणे करून सदरील घाटात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न दुर होईल.असेही खासदार भुमरे म्हणाले.