चापानेर येथे ब्रिकेटच्या कारखान्याला भीषण आग,90 लाखाची नुकसान
सोमनाथ पवार : कन्नड छत्रपती संभाजीनगर
चापानेर येथील मक्याच्या बिट्यापासून ब्रिकेट्स तयार करणाऱ्या कारखान्या स रविवारी पहाटेच्या सुमारास भिशन आग लागली यामध्ये मशीन,शेड, कच्चामाल व पक्का माल असे एकूण 90 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ही आग कन्नड तालुक्यातील चापानेर येथील डी ए एस पी ब्रिकेट्स इंडस्ट्रीज एलएलपी या कारखान्यास लागली चापानेर येथील दशरथ गोरखनाथ सोमासे व अर्जुन गोरखनाथ सोमासे या शेतकऱ्याने दोन वर्षापूर्वी गट क्रमांक आठ मध्ये डी ए एस पी इंडस्ट्रीज या ब्रिकेट बनवण्याचा कारखाना सुरू केला होता
यात तयार होणाऱ्या ब्रिकेट्स हा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना जळतंन म्हणून पूर्वीला जात होता शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कारखाना बंद करून कामगार घरी गेले.
दरम्यान रविवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली पहाटे चारच्या सुमारास ही बाब शुभम घुले या तरुणाच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ फोन करून ही माहिती अर्जुन सोमासे यांना दिली

यांच्यासह ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावले मात्र आग मोठी असल्याने अडचणी आल्या आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून कन्नडतील अग्निशामक दलाला माहिती दिली मात्र तेथील बंब खराब असल्याने ते येऊ शकले नाही

यानंतर छत्रपती संभाजीनगर पालिकेचा व बारामती अग्रो कन्नड अग्निशामक दलास पाचरण करण्यात आले त्यांनी आठ तासाचा अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत डीएएसपी ब्रिकेट्स इंडस्ट्रीज एलएलपी कंपनीचा बनवलेला पक्का माल, कच्चा माल, मशीन व पत्राची सेट हे पूर्ण जळून खाक झाले होते.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागलेली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी दादासाहेब थोरात,बाळू हिरे, संतोष सोमासे, सोमनाथ भांडईत,संदीप ठुबेआदी सह ग्रामस्थानी मदत केली.घटनास्थळी मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी पंचनामा केला यावेळी कन्नड पोलीस ठाण्याचे सपोनी रामचंद्र पवार बीट जमादार बाबासाहेब धनुरे यांनी घटनास्थळी भेट दिली.
