नरभक्ष बिबट्याच्या बंदोबस्तासाठी संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.सात दिवसांपूर्वी लहान मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. तर मागील महिनाभरात अनेकांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
सध्या रबी पिकांचा हंगाम सुरू आहे.यातच शेतकरी राञीला बाहेर पडतात ते पिकास पाणी देण्यासाठी
यातच जर नरभक्षक बिबट्याने आपल्यावर हल्ला केला तर काय करायच? या भितीने शेतकरी हवालदिल झाले आहेत
नरभक्ष बिबट्याचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी शिऊर बंगला येथे बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले.

वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्ष बिबट्याला जेरबंद करण्याची मागण या रास्ता रोको परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली
वैजापूर तालुक्यातील कविटखेडा,
शिऊर बंगला येथे रास्ता रोको आंदोलन करताना ग्रामस्थ अधिक आक्रमक झाले होते
अंचलगाव, लोणी खुर्द, तलवाडा, तिंत्तरखेडा, पेंडेफळ, अलापुरवाडी, कोरडगाव, सफियाबादवाडी अदी गावांमध्ये बकरीच्या पिल्लाचा फडशा पाडला तर फडशा फाडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्यावर लोणी येथे एक तास रस्ता रोको केला होता. बिबट्याच्या धास्तीमुळे रब्बीच्या पिकांना पाणी देण्यास अडचणी येत आहे. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वनविभागाच्या वनपरिक्षेत्र आधिकारी पि. बी. भिसे शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, विजय भिल्ल, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.