छ.संभाजीनगर/खंडाळा
बिंदास न्यूज नेटवर्क/नवनाथ चव्हाण
श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलीत कृषि महाविद्यालय खंडाळा येथील कृषी पदवीतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा गांडूळखत उत्पादन उपक्रमांतर्गत गांडूळ खत निर्मिती व वर्मिंवॉश (गांडूळ अर्क) या घटकांचे उत्पादने तयार व विक्री करण्यास सुरुवात केली असून या उपक्रमाचे उद्घाटन डॉ सी.बी.पाटील सर (सहयोगी प्राध्यापक , कृषी विद्या विभाग , एन ए आर पी छ.संभाजीनगर ) , प्राचार्य डॉ जि.के. बहुरे सर व सर्व प्राध्यापकवर्ग यांनी केले. गांडूळ खतामुळे जमिनीचा कस आणि जमिनीची पोत सुधारते.

अन्नद्रव्यांची उपलब्धता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य संप्रेरक असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढवते.
गांडूळ खत हा सेंद्रिय शेतीतील एक महत्त्वाचा घटक आहे या खतामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होतो आणि निरोगी वाढीमुळे कीटकनाशका वरील खर्चात बचत होते. महाविद्यालया अंतर्गत चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत म्हणून गांडूळ खत व गांडूळ अर्क निर्मिती करण्यासंबंधीचा मानस प्राचार्य डॉ. जी. के. बहुरे यांनी व्यक्त केला.

गांडूळ खत निर्मिती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृषी निगडित उद्योजक बनवण्यासाठी या कार्यक्रमाचा फायदा होईल. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक शिंदे एस. ई. , सूर्यवंशी ए.यु. , शेळके ए. एस. , शिंदे डी. फ.डॉ पी.आर. मते. , मिसाळ एम. आर. , पाखरे एम. एम. , भालेराव के. ए. उपस्थित होते. सर्व अंतिम वर्षातील कृषीदूत व कृषीकन्या उपस्थित होते. तसेच स्थानिक शेतकऱ्यांचाही सहभाग होता.