छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील
महालगाव येथे – वैजापूर तालुक्याला वरदान ठरलेल्या पंचगंगा साखर कारखान्याने उसाला प्रतिटन 2850 रुपये उचल रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. नेमका काय आहे संपुर्ण विषय जाणून घेऊया बिंदासच्या बिंदास Agro या विषयात…

पहिल्या पंधरवाड्यात तुटलेल्या उसाचे बिल शेतकयाच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. अशी माहिती पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी बिंदास दिली आहे. तसेच चांगल्या दरासाठी केंद्र सरकारने साखरेची एम. एस. पी वाढवावी, अशी मागणीही केली आहे.

ते पुढे म्हणाले की आमच्या कारखान्याचे गाळपाचे पहिले वर्ष असून छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये प्रतिटन 2850 रुपये पहिली उचल देणार आमचा पहिला कारखाना आहे. आमचे कारखान्याचे आज अखेर पन्नास हजार मे. टन गाळप झालेले आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आपला ऊस आमचे कारखान्यास द्यावा असे आव्हान ही त्यांनी केले,

साखरेला 4000 रुपये एम. एस. पी. हवी कारखान्याचे तोडणी वाहतुक खर्च 900 ते 1000 रुपये प्रतिटनावर पोहचले आहेत. त्यामुळे केवळ इथेनॉल व विजेचे पैसे मिळवून चालणार नाही. मुख्य उत्पादन आसलेल्या साखरेलाच चांगले दर हवेत यासाठी साखरेस 4000 रुपये एम. एस. पी. (किमान विक्री मुल्य) हवी असे श्री. प्रभाकर शिंदे म्हणाले.
पंचगंगा कारखान्याचा वजन काट्याचे वजन पाहून शेतकरी आनंदी समाधान व्यक्त करत आहेत.
पंचगंगा साखर कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे त्यांनी सांगितलय.यामुळे शेतकयामध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचा कारखान्याप्रती विश्वास अतूट झाला आहे.असे मत वैजापर पंचायत समिती माजी सभापती बाबासाहेब जगताप यांनी व्यक्त केले आहे. या कारखान्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस द्यावा असे आव्हान जगताप यांनी केले आहे.