छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या नेतानगरी बिंदास राजकारण

बिंदास आखाडा: घायगांव गटात चर्चा कुणाची? पंचायत समितीसाठी ही नावेही चर्चेत| Bindass News

छञपति संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा क्षेञातील घायगांव गट हा सर्वाधिक चर्चेत आहे
कारण या गटात विद्यमान आमदार प्रा.रमेश बोरनारे यांचे अस्तित्व अधिक बळकट होताना पहायला मिळत आहे.


असे असले तरी एकेकाळी या गटात स्व लोकनेते आणि मा आमदार आर एम वाणी यांनीही चाहते तयार केले होते.त्यामुळे एकंदरीत या जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या बिंदास आखाड्यात कोण बाजी मारणार ही ऊत्सुकता माञ कायम आहे…
चला तर या जिल्हा परीषद गटात आणि गटाच्या पंचायत समिती गणात कोण आलय चर्चेत पाहुयात या खास रीपोर्टमध्ये

घायगांव गटात जिल्हा परीषद आणि पंचायत समितीच्या आखाड्यासाठी आरक्षण काय सुटत हे अद्याप स्पष्ट नसले तरीही चर्चेतील नांवे माञ चर्चेला तडका लावत आहे.

प्रामुख्याने विधानसभा क्षेञातील सर्वच जिल्हा परीषदेच्या जागा आपल्याच याव्यात याकरीता आमदार बोरनारे हे मास्टरमाइंड गेम खेळतील यात शंका नाही. यातच वाढत चाललेली चाहत्यांची क्रेज त्यांना पथ्यावर पडताना पहायला मिळते आहे.

प्रामुख्याने घायगांव गटासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून दोन नांवे चर्चेत आहेत. एक म्हणजे आमदार प्रा रमेश बोरनारे यांचे निकटवर्तीय,विश्वासू शिलेदार मिञ बाबासाहेब पाटील जगताप आणि दुसरे नांव म्हणजे बोरनारे कुटूंबातील प्रमुख चेहरा संजय पाटील बोरनारे

या दोनपैकी एक चेहरा हमखास आखाड्यात उतरविला जाईल अशी चर्चा आहे.

अगदीच चांगल्या आणि वाईट काळात आमदार बोरनारेंसोबत एकनिष्ठ असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्या नावाला घायगांव गटात पसंती दिली जात आहे. बाबासाहेब जगताप हे विधानसभेच्या अधिवेशनापासून गांव खेड्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमात सतत उपस्थिती दर्शवितात.

याशिवाय असा एकही दिवस नाही ,ज्या दिवसात आमदार बोरनारे आणि बाबासाहेब जगताप हे एकमेंकांच्या सोबत दिसले नाही.
निस्वार्थपणे मैञी ठेवत मैञीधर्माच ज्वलंत प्रतिक असलेली ही जोडगोळी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


कदाचित यामुळेच या गटात बाबासाहेब पाटील जगताप यांना संधी दिली जाऊ शकते. दुसरा विषय असा आहे. यदाकदाचित जर बाबासाहेब पाटील यांना वांजरगांव गटात तीर कमान धरावी लागली तर संजय बोरनारे यांनाही येथे निवडणूक लढवावी लागू शकते

शिवसेना ऊबाठा कडून मा आमदार लोकनेते स्व आर एम वाणी यांचे सुपूञ सचिन ऊर्फ बंडू वाणी यांना निवडणूक लढवावी लागेल अशी दाट शक्यता आहे.कारण टफ फाईटचा विषय समोर येत असताना सचिन वाणी हेच येथील लढतीस अधिक योग्य असल्याची चर्चा मतदार संघातील जनतेत आहे.त्यामुळे पक्षादेश आलाच तर वाणी पुन्हा या गटात मशाल घेऊन उतरतील यात शंकाच नाहीय.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मंजाहारी गाढे यांना या गटात निवडणूक लढवायची असल्याची माहिती मिळत आहे
परंतु संवंदगांव गटात गाढे आपले नशिब आजमवू इच्छितात अशी चर्चा आहे.
एकंदरीत या गटातील अवघड वाटणारी समिकरणे कधी सोपी होतील सांगता येत नाही.

लाडगांव गणाच्या आखाड्यात काय सुरू आहेत पाहूया..
या गणात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून राजेंद्र निंबाळकर यांच नांव चर्चेत आहे तर अंकुशराव हींगे,पप्पु लांडे यांची ही नांवे चर्चेत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाकडून पंकज ठोंबरे यांचे सहकारी शिलेदार सत्यजित सोमवंशी ,रुतूराज सोमवंशी यांची नांवे चर्चेत आहेत.
शिवसेना ऊबाठा पक्षाकडून रमेश पाटील सावंत यांच नांव समोर येत आहे.एकंदरीत गटापेक्षा गणाकडे जास्तीची ओढताण होईल अशी संभाव्यता आहे.

गटाच्या घायंगावं गणात
शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ,युवासेनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम गायकवाड यांचे नांव चर्चेत आहेत.

याशिवाय आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या परीवारातील आणखी एक सदस्य अमोल बोरनारे हे ही या निवडणूकीत रिंगणात ऊतरू शकता.. याची शक्यता नाकारता येत नाही.

कारण अमोल बोरनारे यांच्या मातोश्री पंचायत समिती सदस्या होत्या तसेच सध्या शिवसेना पक्षात त्या उपजिल्हाप्रमुख पदावर काम करत असल्या कारणाने अमोल बोरनारे यांचाही विचार होऊ शकतो.

परंतु याच गणात सरांच्या सरसेनेतील आमदार प्रा रमेश बोरनारे यांच्या परीवारातील सदस्य असलेले दिनेश बोरनारे यांच्या नांवावर जनतेकडून शिक्कामोर्तब होताना पहायला मिळतय.दिनेश बोरनारे हे सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असतात केवळ गणातच नाही तर तालुकाभरात त्यांनी सर्वपक्षीय संबंध जपून ठेवले आहेत.

बँकेशी सलग्न शेतकऱ्यांची कामे,तरूणांचे क्रीकेट आणि विरोधकांची व्हिकेट घेण्यात दिनेश बोरनारे या गणात चर्चेत आले आहेत.त्यामुळे दिनेश बोरनारे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.


याशिवाय हरीभाऊ साळुंके हे आमदार प्रा रमेश बोरनारेंसाठी चांगले काम करतात त्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते.
शिवसेना ऊबाठा पक्षाकडून दानवे यांचे चाहते असलेले अक्षय साठे यांना संधी मिळू शकते.

शिवाय वाणी परीवारासोबत असलेली साठे यांची निष्ठा त्यांना निश्चित फळ देईल अशी चर्चा आहे.
याशिवाय याच पक्षाकडून भाऊसाहेब गलांडे हे अनुभवी व्यक्तीमत्व पुन्हा आखाड्यात दिसू शकते याची शक्यता नाकारत नाही.

तर मिञांनो आणखी पुढील अपडेटमध्ये कुठला चेहरा चर्चेत येतोय कमेंटबॉक्समध्ये कळवायला विसरू नका
धन्यवाद

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.