पराशर रुषींसोबत प्रभु राम,सिता लक्ष्मणाची भेट-नागरीकांनी बांधले मंदिर
छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेले पालखेड हे पेशवे आणि निजामाच्या युद्धान जगात विख्यात झाले आहे.पहिल्या बाजीरावाने जेव्हा निजामाच्या सैन्याची रसद बंद करून बुद्धीचातुर्याने रक्ताचा थेंबही न सांडता ही लढाई जिंकली तेव्हाच पालखेड चे नांव इतिहासात लिहीले गेले.

परंतु या पालखेडला यापेक्षाही जुना पौराणिक इतिहास आहे.तो म्हणजे जगाचे मालक प्रभु श्रीरामांचा ! वैजापूर तालुक्यातील पालखेड येथून जळगांव तसेच खिर्डी यांसह अन्य गावांना जोडून बोरनदी प्रवाहीत असते.याच बोरनदीच्या तीरावार तीन गावांच्या शिवावर प्रभु श्रीरामांच्या नावाने “रामाचा खडक” हे स्थळ पौराणिकता दर्शविते.

काय आहे ‘प्रभु श्रीरामाचा खडकाची’ अख्यायिका
पावसाळ्यात जी नदी दुथडी भरून खळखळ वाहते त्याच नदिच्या आजूबाजूला पुर्वी खुप मोठे घनदाट जंगल होते.प्रभु श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा ते माता सिता,लक्ष्मणासह या नदिच्या तीरावर काही दिवस वास्तव्यास होते.

याच ठीकाणी त्यांची पराशर रुषींसोबत भेट झाली.त्यानंतर ते पुढे गोदावरी तीरी म्हणजेच कायगांव टोका येथे गेले पुढे हरीणीचे रुप घेतलेल्या मामा मारीच चा वध करून पंचवटीकडे प्रस्थान केल्याची अख्यायिका आहे.
बोरनदी तिरी ‘रामाचा खडक’ अन महाकुंड अस्तित्वात
पौराणिक महत्व लाभलेल्या या बोर नदीच्या तिरावर प्रभु रामांचे वास्तव्य झाले तो खडक आजही आहे.एककेकाळी हा खडक खुप मोठा असल्याचे जानकार मंडळी सांगतात,खडकाच्या समोरच शुद्ध पाण्याचा भला मोठा महाकाय महाकुंड अस्तित्वात असल्याचे जाणकार सांगतात.

येथे पुराचे पाणी आणि त्यासोबत वाहून येणाऱ्या गाळामुळे हा कुंड जमिनदोस्त झाला आहे. तर खडकाचा अगदी काहीसाच भाग आजही पहायला मिळतो.
खडकालगत नागरीकांनी लोकवर्गणीतून ऊभारले आकर्षक मंदिर
परीसरात जवळपास प्रभु श्रीरामांचे मंदिर नाही तसेच प्रभु रामचंद्रांचे इथे वास्तव्य झाल्याने येथील मातीत त्यांचा सहवास अजराअमर झाला आहे.त्यामुळे येथेच नागरीकांनी भाविकांच्या दर्शनासाठी आणि लाभलेला पौराणिक वारसा जतन करण्यासाठी भव्य दिव्य आणि आकर्षक मंदाराची ऊभारणी केली आहे.

लवकरच येथे प्रभु श्रीराम,माता सिता आणि लक्ष्मणाच्या मुर्तीची स्थापना करून मंदिर दर्शनार्थींसाठी खुले करण्यात येणार आहे.आज रामनवमी निमीत्त येथे प.पु.जदगुरू संत श्री जनार्दन स्वामींचे शिष्य प.पु.बालगिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचण त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.प्रभु रामांचे मंदिर पुर्णत्वास जात असल्याने येथे आगळा-वेगळा सोहळा साजरा करण्यात आला.