छञपति संभाजीनगर विशेष ताज्या बातम्या रोखठोख

Jagdama Temple : द्राक्षांच्या आरसने सजले जगदंबा मंदीर| परंपरेबाबत जाणून घ्या!

बाबासाहेब वाघ

दहेंगांव/छञपती संभाजीनगर

बोर दहेगाव येथील जगदंबा देवी यात्रा उत्सवास शुक्रवार पासून सुरवात.

यात्रेनिमित्त द्राक्षांनी देवीची आणी गाभाऱ्याची सजावाटिमुळे उजळून गेले मंदिर.

वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथील जागृत ग्राम दैवत व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली जगदंबा देवी च्या यात्रा उत्सवास दिनांक ४एप्रिल शुक्रवार पासून सुरुवात झाली असून,तीन दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवामध्ये बोर दहेगाव ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले आहे .

यात्रे निमित्त शुक्रवारी पहाटे जगदंबा देवी ला पहाटे महाभिषेक,यज्ञ पुरोहित धनंजय ऋषींपाठक यांच्या मंत्रोउच्चराणे होम हवन करून, देवीच्या यात्रेला सुरवात झाली आहे.तसेच सायंकाळी ५ वाजता जगदंबा देवीच्या पालखीची सवाद्य भव्य मिरवणूक तसेच सायंकाळी महाआरती चे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यात्रे निमित्त गावातील महिला घरो घरी प्रसाद म्हणून गोड (भजे )गुलगुले करतात.

आप आपल्या घरासमोर सडा रांगोळी, काढून प्रत्येक घरावर तोरण बांधण्यात आले.



येथील ग्राम दैवत जगदंबा देवी यात्रे निमित्त यावर्षी देवीला आणी देवीच्या गाभाऱ्याची काळ्या रंगाचे आणी हिरव्या रंगाच्या द्राक्षाच्या घसानी सजावट करण्यात आली. देवीच्या गाभाऱ्यात द्राक्षाची आकर्षक सजावट केल्यामळे मंदिराच्या गाभाऱ्याचे आणी देवीच्या मूर्तिचे रुपडे खुलले होते. आणी द्राक्षाची सजावट यावर्षीच्या यात्रेचे नवीन आकर्षण बनले आहे.देवीच्या मंदिराचा गाभरा सजवण्यासाठी नाशिक येथून खास द्राक्ष मागवण्यात आले होते तर काही द्राक्ष भक्तांनी सजावटीसाठी भेट दिले होते.

देवीचा गाभरा द्राक्षांनी सजाला.

देवीच्या यात्रेच्या पाहिल्या दिवशी ग्रामस्थांतर्फे दर्शनाला येणाऱ्या भाविकासाठी दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम,आणि जागरण गोंधळचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.


आणि यात्रेनिमित्त रविवारी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.यात्रेनिमित्त रविवारी संध्याकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट दाखवन्यात येणार आहे.


देवीच्या दर्शनासाठी येतात बाहेरून भाविक —
बोर दहेगाव येथील नवसाला पावणाऱ्या जगदंबा देवी च्या यात्रेसाठी महराष्ट्रातील मालेगाव, धुळे ,जळगाव या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर तर आसपासच्या गावातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतात.विशेष करून खान्देश भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त या ठिकाणी येत असतात.


या ठिकानी येणार प्रत्येक भाविक भक्त देवीला आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात .व मनोकामना पूर्ण झाल्यावर या ठिकाणी खान्देश तसेच बाहेरील जिल्ह्यातून व परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाविक जगदंबा देवीच्या दर्शनासाठी नवस पूर्ण करण्यासाठी येतात .म्हणून येथील ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

देवीला आवडतो नारळ आणी गुळाचा प्रसाद —
बोर दहेगाव येथील ग्राम दैवत जगदंबा देवी यात्रे निमित्त संपूर्ण गावातील ग्रामस्थ मोठया प्रमाणात गुळ आणी नारळा चा प्रसादाचे वाटप करतात.याचं दिवशी नवस फेडण्यासाठी भाविक भक्त पाच,ते दहा किलो गूळ, आणी पाच, अकरा, एकवीस नारळ प्रसाद म्हणून वाटप करतात.


बोर दहेगाव येथील यात्रेला विविध प्रथा आणी परंपरा मुळे आगळे वेगले महत्व आहे. त्यामुले येथील ग्राम दैवत जगदंबा देवीची यात्रा दरवर्षी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येते.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.