ताज्या बातम्या बिंदास महाराष्ट्र

  Municipality rushes for recovery : थकबाकीदार फलकावर  कन्नड नगरपालिका वसुलीसाठी सरसावली

Muncipality 

 

 

कन्नड येथील नगरपालिकेने विविध करांच्या थकबाकी वसुलीसाठी अनोखी शक्कल लढविली असून, अनेक महिन्यांपासून कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांच्या नावाचे फलक सार्वजनिक ठिकाणी लावले आहेत. हे फलक बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

(On the lines of March End, various tax collection campaign in all local self-government bodies)

मार्च एण्डच्या धर्तीवर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध करांची वसुली मोहीम सुरू आहे. या कर वसुलीसाठी कन्नड नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अनोखी शक्कल लढविली आहे.

वारंवार नोटीस देऊन व न.प. कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा करूनही

कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची यादी सार्वजनिक ठिकाणी लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार २८ फेब्रुवारी रात्री ०८:०० वाजता मालमत्ता कर थकबाकीदार व्यक्तीच्या नावांची यादी असलेले फलक शहरातील चौकाचौकांत लावण्यात आले आहेत. यात ४६ मोठ्या थकबाकीदारांकडे नगरपालिकेचा २१ लाख ७३ हजार ३२१ रुपयांचा कर थकला आहे. हा कर संबंधितांनी तातडीने भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन या फलकावर नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर या फलकावरील नावे पाहण्यासाठी शुक्रवार व शनिवारी नागरिकांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले. दिग्गज व्यक्तींची नावे यादीत पाहून अनेक व्यक्तींनी आश्चर्य व्यक्त केले. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही या व्यक्ती नगरपालिका प्रशासनास कर का भरत नसतील, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

न.प.ची कर वसुलीसाठी शक्कल

 

फलक लावल्यापासून ७ दिवसांच्या आत थकबाकीदारांनी कर जमा करावा. त्यांनी ७ दिवसांत कर न भरल्यास त्यांच्या घरासमोर ढोल, ताशे वाजवण्यात येतील. एवढे करूनही कर न भरल्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल. विद्याचरण कडवकर, प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार

थकबाकीदारांची नावे फलकावर लावली.

४६ मोठ्या

थकबाकीदारांकडे न.प.चा २१ लाख ७३ हजार ३२१ रुपयांचा कर थकला आहे. कर भरण्याचे न.प. प्रशासनाने आवाहन केले आहे.

हे आहेत, शहरातील सर्वाधिक थकबाकीदार

मनीष मोहन भारुका २ लाख २,२८५ रुपये, महेशकुमार विनोदकुमार भारुका १ लाख ५२ हजार ४१४ रुपये, नितीन शिवप्रसाद भारुका १ लाख ३७ हजार २८८ रुपये, गोपाल ओमप्रकाश भारुका १ लाख १९ हजार १०५ रुपये, रशीद अब्दुल खाँ ७८ हजार ४४७रुपये.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.