राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून जि.प.कें. प्रा.शाळा बोरसर येथे कलारंग 2025या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणारे कला,गुण,कौशल्य यांचे प्रदर्शन विविध पारंपारिक नृत्य, धार्मिकनृत्य,संत परंपरा सांगणारी गीते, लोककला ,लावणी ,प्रबोधनात्मक नाटिका ,विनोदी चुटकुले इ.कार्यक्रमाच्या सादरीकरणातून दाखवण्याचा प्रयत्न केला .
वर्ग पहिली ते चौथी पर्यंत 104 विद्यार्थी असून 100%विद्यार्थ्यांनी या कलारंग कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता . या बालचिमुकल्याचा कलाविष्कार पाहण्यासाठी बोरसर गावातील ग्रामस्त ,माताभगिनी,शिक्षणप्रेमी नागरिक तसेच पालक ,पदाधिकारी याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .

या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक गावाच्या प्रथम नागरिक मायाताई होले ,बोरसर केंद्राचे केंद्रप्रमुख दिलीप ढमाले तर प्रमुख पाहुणे अरुण होले ,ग्रा.प.सदस्य मनोज गोरे ,संजय कानडे ,वसंत पवार,रुक्मणबाई मोरे , प्रशालेचे मु.अ.शिंपी ,माध्यमिक शिक्षक गायके ,वाठोरे ,बर्गे, राठोड ,सुनिल त्रिभुवन सर ,सिताराम पवार,सोनवणे , तसेच पत्रकार विजय त्रिभुवन हे होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शा.व्य.समिती जि.प.कें.प्रा.शाळा बोरसर व सर्व शिक्षक स्टाफ जि.प.कें.प्रा.शाळा बोरसर यांनी मेहनत घेतली.