रामगिरीजी महाराज हे हिंदू धर्मयोध्ये- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महंत रामगिरी महाराज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार
महाराष्ट्र हे संतांची भूमी असून संत तुकाराम संत एकनाथ ज्ञानोबा असे अनेक थोर संत या भूमीत श्रीक्षेत्र गो धाम सरला बेट येथील योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने मी मुख्यमंत्री असताना भेटीचा योग आला

तेव्हा याची देही याची डोळा वारकऱ्यांचा महा कुंभ पाहिला लाखो भक्तगणांचा मेळ्यामध्ये या संताचे कार्य व खाण्या जोगे असून राजनिष्ठेवर आध्यात्मिक निष्ठा वरचढच राहिले आहे आणि वरच पाहिजे महंत रामगिरी महाराज हे खरंच धर्माचा कार्य करीत असून ते खरोखर धर्मयोद्धा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथची शिंदे साहेब यांनी केले.
श्रीक्षेत्र वढू बू येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात धर्मवीर संभाजीराजे पुरस्कार समितीच्या वतीने महंत रामगिरीजी महाराज यांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे कार्य संतोउपदेशाने चालत होती.

मी सुद्धा शेतकरी वारकरी घराण्यातील असून माझे कार्यही आध्यात्मिक निष्ठेवर अवलंबून असून संत जे मार्ग दाखवतील त्यानुसार चालते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,शिवसेना पक्षाचे प्रतोद तथा आमदार प्रा रमेश बोरनारेदेहू संस्थानचे ह भ प पुरूषोत्तम मोरे तुकाराम महाराज पालखी प्रमुख माणिक महाराज मोरे,वारकरी आघाडीचे अक्षय भोसले,संभाजी महाराज समाधी ट्रस्टचे सोपान महाराज,गोरक्षक दलाचे मिलिंद एकबोटे,आमदार माऊली बाबा कटके,माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,याचासह राज्यातील अनेक मान्यवर राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील शिवभव्ताची मोठी उपस्थिती होती.
गो मातेला राज्य मातेचा दर्जा दिला ,पण अजुनही गोहत्या थांबलेली नाही अशी मंहत रामगिरी महाराज खंत व्यक्त केली, ठिकाणी ठिकाणी गोमांस विक्री होते गोरक्ष तरूण मुले ते पकडून गोमांस विक्री करणार्याला पोलिसाच्या ताब्यात दिले जाते परंतु पोलीस प्रशासनाकडून गोरक्षकाना सपोर्ट मिळत नाही उलट या तरुण गोरक्षकाना दोषी केले जाते ,हे कुठे तरी थांबले पाहिजे असे मत महंत श्री रामगिरी महाराज व्यक्त केले