परिचारिकेचा केला खून शेतातील घरात पुरले :
लासूर स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना
संभाजीनगर येथील मनपाच्या दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचा लासूर स्टेशन परिसरात खून करून मृतदेह शेतातील घरात खड्डा करुन पुरल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. सहा दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून रात्री उशिरापर्यंत शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मोनिका मार्कस झांबरे (वय ३०) असे मयत परिचारिकेचे नाव आहे.
तरुणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादातनगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील मोनिका झांबरे ही तरुणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सादातनगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत होती. तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील सुमित निर्मळ याच्याशी झाला होता; मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने मोनिका ही जालना येथे आईवडिलांकडे
तेथून ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करत नोकरी करीत होती
राहत होती. तेथून ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करत नोकरी करीत होती. मात्र ६ फेब्रुवारीला ती नियमितपणे रेल्वेने जालना येथे घरी पोहोचली नाही. त्यामुळे तिची आई सुनीता झांबरे यांच्या फिर्यादीवरून हरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, लासूर स्टेशन येथील इरफान शेख याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मोनिकाचा गळा आवळून खून केल्याचे तसेच मृतदेह त्याच्या लासूर स्टेशन येथील शेतातील घरात पुरल्याचे पोलिसांना सांगितले.
मोनिका हिचा मृतदेह नग्नावस्थेत कुजलेला आढळून आला.
त्यानंतर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी मोनिकाच्या आई व नातेवाइकांना लासूर स्टेशन येथे नेऊन तेथे इरफानच्या घरात उत्खनन केले. यावेळी मोनिका हिचा मृतदेह नग्नावस्थेत कुजलेला आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच डॉक्टरांना पाचारण करून शवविच्छेदन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लासूर स्टेशन परिसरातील याच शेतातील घरात मोनिकाचा मृतदेह पुरता होता.
नातेवाइकांनी केला पती व त्याच्या कुटुंबीयांवर आरोप मयत मोनिका हिच्या आईने दिलेल्या
मोनिका हिच्यावर अत्याचार करून तीला
तक्रारीनुसार, आरोपी इरफान याने मोनिका हिचा पती सुमित निर्मळ, सासू सपना निर्मळ, सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून मोनिका हिच्यावर अत्याचार करून तीला संपविल्याचा आरोप आहे.
मृतदेह खड्डा करून पुरला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे खुनाचे नक्की कारण समजू शकले नाही.