ताज्या बातम्या नेतानगरी

माझ्या नावांपुढ मा लावू नका -रावसाहेब दानवेंची कार्यकर्त्यांना सुचना

एखादा मंत्री, आमदार, खासदार माजी झाला

की त्यांना जेवढे दुखः होत नाही, त्यापेक्षी कितीतरी पट त्यांच्या समर्थकांना होते. आपल्या नेत्याला ते माजी झाल्याची जाणीव होऊ नये यासाठी स्वागत, वाढदिवस असो की मग इतर कुठलाही पक्षाचा कार्यक्रम यावर माजी असा थेट उल्लेख करणे नेत्याचे समर्थक टाळतात. भोकरदनमध्ये या माजीवरूनच भर कार्यक्रमात एक मजेशीर प्रसंग घडला.


माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve) राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि विद्यमान आमदार संतोष दानवे एकाच व्यासपीठावर आले होते. रावसाहेब आणि चंद्रकांत दानवे कार्यक्रमासाठी व्यासपीठावर वेळेवर उपस्थित होते. तर आमदार संतोष दानवे यांना येण्यास काहीसा उशीर झाला.

त्याआधी चंद्रकांत दानवे यांनी आपल्या भाषणात या सरकारी कार्यक्रमात माजी मंत्र्यांचे काय काम ? रावसाहेब दानवे आणि मी दोघेही माजी असे म्हणत डिवचले.


यावर चंद्रकांत दानवे यांना प्रत्युत्तर देण्याची वाट पहाणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी संधी मिळाली तेव्हा ‘मला पद असले काय? आणि नसले काय? काहीच फरक पडत नाही. (BJP) माझे कार्यकर्त्यांनाही सांगणे आहे, त्यानी माझ्या नावापुढे फक्त मा. असा उल्लेख न करता स्पष्टपणे माजी मंत्री असा करावा.

‘रावसाहेब दानवे सिर्फ नाम ही काफी है’, असेच त्यांना सुचवायचे होते. एकाच व्यासपीठावर आलेल्या या तीन दानवेंमधील रंगलेल्या राजकीय जुगलबंदीने उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन केल्याची चर्चा यावेळी रंगली होती.


भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमात कट्टर विरोधक असलेले रावसाहेब आणि चंद्रकांत दानवे हे एकमेकांच्या बाजूला बसले होते. दोन्ही दानवे प्रथमच एखाद्या शासकीय कार्यक्रमात अगदी सग्या सोयऱ्यासारखे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत होते.

भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला माजी खासदार स्वातंत्र्य सेनानी दिवंगत पुंडलिक हरी दानवे यांचे नाव देण्यात आले. याचे उद्घाटन व नामकरण सोहळा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माजी मंत्री रावसाहेब दानवे व माजी आमदार चंद्रकांत दानवे व्यासपीठावर उपस्थित होते.


चंद्रकांत दानवे यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये रावसाहेब दानवेंना टोला लगावला. ‘दानवे साहेब हा तसा शासकीय कार्यक्रम आहे, परंतु तुम्ही पण माजी मंत्री, खासदार अन् मी माजी आमदार आहे. विशेष म्हणजे या संस्थेला नाव देखील माजी खासदारांचेच देत आहोत. चंद्रकांत दानवेंचा इशारा कोणाकडे आहे हे दानवेंना बरोबर कळले. मग त्यांनी आपल्या भाषणामध्ये चंद्रकांत दानवेंच्या विधानाचा धागा पकडत जी काही जोरदार बॅटींग सुरू केली, की उपस्थितांनी त्याला भरभरून दाद दिली.


पुंडलिक हरी दानवे हे माझे गुरु होते. माझे आणि त्यांचे घरगुती संबंध होते. एवढेच नाही तर मी चंद्रकांत, सुधाकर आणि बबनराव तिघांच्या लग्नात होतो. पण चंद्रकांत तू आमच्या कोणाच्याही लग्नकार्यात नव्हता. तुझी लग्नाची सोयरीक सुद्धा म्याच जोडली. तुमचे वडील गेले तेव्हा मी अंत्यसंस्काराला आलो होतो. तुम्ही मात्र माझे, वडील गेले तेव्हा आला नव्हता. ‘बाप हा बाप’ असतो आम्ही राजकारणात त्यांचे मार्गदर्शन आणि सहवास नाकारला नाही. पुण्याई आम्ही त्यांच्याकडून शिकलो तुम्ही देखील शिका, असा टोला रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवेंना लगावला.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.