बिंदास भिडू

सुपरस्टार अमिताभ यांनी कॉलेज जीवनातील किस्सा सांगून जाग्या केल्या जुन्या आठवणी !

मुंबई | अमिताभ म्हंटल की आठवतो, शेहनश्या, खुदा गवाह, जंजिर, अशी किती सिनेमांची नावे घ्यावीत.

ह्याच अमिताभ यांच्या कॉलेज जीवनातील आठवणी जेंव्हा ते स्वतः प्रेक्षकांना सांगतात त्यावेळी त्यांच्या तोंडून ती ऐकणं म्हणजे पर्वणी असते.असाच भन्नाट अनुभव कोण बनेगा करोडपती च्या शो दरम्यान आला यावेळी अमिताभ यांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या.

दिल्ली मद्ये विद्यार्थी असताना ते तीन सुंदर मुलींच्या सोबत बस मद्ये जात होतो. ही बस संसद आणि कॅनॉट प्लेस च्या बाजूने महाविद्यालयात जात असे.

बऱ्याच दिवसांनी ज्या वेळी मी महाविद्यालयातुन पदवी घेऊन बाहेर पडलो आणि नोकरी करू लागलो त्यावेळी त्या तिघी मधली एक मला भेटली जी माझ्या कॉलेज जीवनात बस मधील सहप्रवासी होती.

पुढे बोलताना बिग बी म्हणलेकी त्या महिलेने सांगितलं की माझी एक झलक पाहण्यासाठी ती तिचा मित्र प्राण याच्या सोबत उभी असायची. ज्या वेळी बस यायची त्या वेळी महिलेच्या मनात असा विचार यायचा की प्राण जाये पण अमिताभ न जाये.अस ही बिग बी नि सांगितलं.

सध्या बिग बी आपला कोण बनेगा करोड पती चा ११वा सिजन होस्ट करत आहेत.हा रीयल्टी शो सोनी टीव्ही वर प्रसारित होत आहे.

बिंदास न्यूज चे व्हिडीओ अपडेट

फॉलो करा.

संबंधित बातम्या

Advertisement

Advertisement

error: कृपया बातमी कॉपी करू नये.